पुणे : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटला आहे. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळविण्याच्या निर्णायावरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरकरांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित पुण्यातील सिंचनभवनात दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक काल झाली.
उजनी धरणातील पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु, ही बैठक चर्चेदरम्यान वादाचा आखाडाच बनली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अधिकार्यांसमोरच चर्चेतील खडाजंगीतून सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी एकमेकांना भिडले. यातून तणावपूर्ण गोंधळ निर्माण झाला. खूपवेळ रेंगाळलेल्या बैठकीत मात्र अखेर निर्णय झालाच नाही.
या सर्व प्रकाराबाबत जनहितचे प्रभाकर देशमुख म्हणाले, एकीकडे पुण्यात उजनीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी पुण्याला बैठकीचे नाटक केले. पण दुसरीकडे आमचे आंदोलन दडपण्यासाठीच अगोदरच त्या ठिकाणी पुणे, इंदापूरचे शेतकरी आणि शिवेसेनेचे कार्यकर्ते बोलावले होते. त्यांची भूमिका सोलापूरबाबत स्वच्छ नाही. त्यामुळे यापुढे त्यांना सोलापूर जिल्ह्यातील थेंबही पाणी नेऊ द्यायचे नाही असा आम्ही एकमुखी निर्णय घेतला आहे.
दरम्यान,यावेळी बोलताना भरणे म्हणाले, एक ठिपका पाणीही सोलापूरचं घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही. सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचा राजीनामा देईल अशी भूमीका भरणे यांनी घेतलीय.यावेळी बोलतांना भरणे यांनी या सगळ्या बाबत गैरसमज झाला असून तो दूर करण्यासाठी ही बैठक असून यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप भरणे यांनी केलाय.
दरम्यान, सिंचन भवनमध्ये झालेल्या बैठकीत दत्तात्रेय भरणे यांनी जे सांगितले आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. पालकमंत्री भरणे हे चोर आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत. आमचं (सोलापूरच्या हिश्याचं) पाणी चोरलंय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे गोलमाल दिली जात आहेत, त्यामुळे यापुढचं आंदोलन आम्ही गोविंद बागेत करू, असा इशारा उजनी धरण पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला आहे.
इंदापूरचे प्रतिनिधी म्हणून बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की, उजनी धरणातून पाणी उचलून खडकवासला कालव्यात आणलं जाणार आहे. ही योजना जुनीच आहे. अजित पवारांबाबत ते उल्लेख करताय, ते चुकीचे आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. सोलापूरचे पाणी पळवलं जातंय, असा गैरसमज निर्माण केला जात आहे. मात्र, ते वास्तव नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- ‘सोलापूरचे पाणी पळवणारे भरणे हे चोर आहेत आणि अजित पवार हे दरोडेखोर आहेत’
- एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्तानच्या बाबर आझमने मारली बाजी
- बीडचा ‘कृषी विमा पॅटर्न’ आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी
- ख्रिस भाऊ घेतोय जगातील सर्वात मोठ्या बर्गरचा आस्वाद ; पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

