मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. स्पर्धा रद्द झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले अनेक विदेशी खेळाडू हे मायदेशी परतले आहे.
अशातच पंजाब संघाचा धुरंदाज फलंदाज ख्रिस गेल सध्या मालदीवमध्ये आहे. परदेशातील खेळाडू याच मार्गावरुन मायदेशी परतणार आहेत. मालदीवमध्ये असलेल्या युनिवर्सल बॉसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ख्रिस बर्गरचा अस्वाद घेताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ख्रिस गेलने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केलाय. ब्रेकिंग न्यूज यूनिवर्सल बॉस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बर्गर घात आहे, असे कॅप्शनसह त्याने हा व्हिडिओ शेअर केलाय. माझ्या हातामध्ये सर्वात मोठा बर्गर आहे. मला बर्गर खूप आवडतो. माझ पोट भरले असून उरलेला बर्गर मी घरी घेऊन जातोय, असं गेल या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट सहकाऱ्यांना बालपणीच्या मित्रासारखी वागणूक देतो : मोहम्मद शमी
- ‘हा’ खेळाडू इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात स्थान मिळवु शकला असता, राहुल द्रविडने केले व्यक्त मत
- ‘कुणीतरी येणार येणार गं..’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सच्या घरी लग्नाआधीच पाळणा हलणार
- सरकारी काम आणि सहा महिने थांब! भाजप करणार ऑक्सिजन प्लांटचे प्रतिकात्मक उदघाटन
- लोकांना पाणी पाजण्यासाठी उद्घाटन केले! दोन आठवड्यानंतर आ. शिरसाट यांचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

