सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटला आहे. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळविण्याच्या निर्णायावरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरकरांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित पुण्यातील सिंचनभवनात दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक काल झाली.
दरम्यान,यावेळी बोलताना भरणे म्हणाले, एक ठिपका पाणीही सोलापूरचं घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही. सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचा राजीनामा देईल अशी भूमीका भरणे यांनी घेतलीय.यावेळी बोलतांना भरणे यांनी या सगळ्या बाबत गैरसमज झाला असून तो दूर करण्यासाठी ही बैठक असून यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप भरणे यांनी केलाय.
दरम्यान, सिंचन भवनमध्ये झालेल्या बैठकीत दत्तात्रेय भरणे यांनी जे सांगितले आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. पालकमंत्री भरणे हे चोर आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत. आमचं (सोलापूरच्या हिश्याचं) पाणी चोरलंय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे गोलमाल दिली जात आहेत, त्यामुळे यापुढचं आंदोलन आम्ही गोविंद बागेत करू, असा इशारा उजनी धरण पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- इंग्लंडमधील भारतीय संघाचा १४ वर्षाचा वनवास संपेल का..?
- एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्तानच्या बाबर आझमने मारली बाजी
- बीडचा ‘कृषी विमा पॅटर्न’ आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठरणार संजीवनी
- ख्रिस भाऊ घेतोय जगातील सर्वात मोठ्या बर्गरचा आस्वाद ; पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

