🕒 1 min read
मुंबई : एप्रिल महिन्याच्या आयसीसी पुरस्कारात पाकिस्ता क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने बाजी मारली आहे. या पुरस्काराच्या स्पर्धेत त्याचा सहकारी फखर जमान आणि नेपाळचा क्रिकेटपटु कुशल भुर्तेल हे दोघे होते. जानेवारी महिन्यापासुन सुरु झालेल्या या पुरस्काराच्या शर्यतीत प्रथमच भारतीय खेळाडूंचा समावेश नव्हता.
जानेवारी २०२१ महिन्यापासुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रत्येक महिन्यातील कामगिरीच्या आधारे ‘प्लेअर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार सुरु केला. यानंतर जानेवारी महिन्यात आर अश्विन, फेब्रुवारी महिन्यात रिषभ पंत आणि मार्च महिन्यात भुवणेश्वर कुमार या भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. मात्र यांनतर भारतीय संघाने एप्रिल महिन्यात आयपीएल स्पर्धेमुळे एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळल्याने भारतीय खेळाडूंना या पुरस्कारात नामांकन नाही मिळाले.
???? Three ODIs, 228 runs at 76.00
???? Seven T20Is, 305 runs at 43.57
???? Became the No.1 ODI batsmanWell done, @babarazam258 for winning the ICC Men's Player of the Month for April ????#ICCPOTM pic.twitter.com/CuCaodFEk7
— ICC (@ICC) May 10, 2021
एप्रिल महिन्यातील पुरस्कारात सर्वेत्तम पुरुष क्रिकेटपटुचा पुरस्कार हा पाकिस्तानचा बाबर आझम याने तर सर्वेत्तम महिला क्रिकेटपटुचा पुरस्कार हा ऑस्ट्रेलियाच्या ऐलिसा हेलीला जाहीर झाला. एप्रिल महिन्यात बाबर आझमने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यात २२८ धावा केल्या होत्या. यात एका शतकाचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळे बाबारने एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ख्रिस भाऊ घेतोय जगातील सर्वात मोठ्या बर्गरचा आस्वाद ; पहा व्हिडीओ
- केकेआरच्या ‘या’ दोन खेळाडुंनी केली कोरोनावर मात
- कोहली-रोहितच्या अनुपस्थीतीत ‘हा’ खेळाडु करु शकतो भारतीय संघाचे नेतृत्व
- विराट सहकाऱ्यांना बालपणीच्या मित्रासारखी वागणूक देतो : मोहम्मद शमी
- ‘हा’ खेळाडू इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात स्थान मिळवु शकला असता, राहुल द्रविडने केले व्यक्त मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

