Share

अभिनेत्री प्रिया बापटने कोरोनातून बरं झाल्यानंतर केले मोठं काम…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामान्यांपासून ते कित्येक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही सेलिब्रिटी बरेही झाले आहेत. अशाच आता मराठी अभिनेत्री प्रिया बापटला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोनातून बरं झाल्यानंतर तिने मोठं काम केलं आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या प्रिया बापटने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने पहिल्यांदाच रक्तदान केले असून ‘ आता मला शांत झोप लागेल ‘ असे ती म्हणते.

https://www.instagram.com/p/COsZs_ThRTp/?igshid=11zk7iwdea0ry

प्रियाने याबाबत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत सांगितलं की, “हे माझं पहिलं रक्तदान आहे. हो, मला माहिती आहे हे मी खरंतर पहिलंच करायला हवं होतं. पण मला खरं तर सुईची फार भीती वाटते. त्यामुळे मी कधी इंजेक्शन घेण्याचंही धाडस केलं नाही. अशी मी दुर्मिळच असेन. माझा रक्तगटही तेच सांगतं. माझा रक्तगट ए निगेटिव्ह आहे. त्यामुळे एखाद्या दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीने रक्तदान करणं हे महत्त्वाचं आहे. माझे डॉक्टर सांगायचे, रक्त ही एकच गोष्ट आहे जी व्यक्ती जिवंत असताना दान करू शकते आणि तू ते करायला हवं”.

पुढे ती म्हणते की, “मी जर आता माझ्या भीतीवर मात केली नसती तर मला खूप पश्चाताप झाला असता, माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असंच वाटलं असतं. त्यामुळे कोरोनातून बरं झाल्यानंतर मी माझ्या भीतीवर मात करण्याचा निर्णय घेतला आणि किमान एक जीव वाचवण्यासाठी मी जे काही करू शकते ते केलं. या महासाथीत आपणा सर्वांनाच असहाय्य वाटतं आहे. पण फक्त रक्तदान करून मला काही बळ मिळालं आहे. मी जे करू शकत होते ते केलं. आज मी कोणत्याही अँझायटीशिवाय शांत झोपेन. आज मी झोपेन, या भुयाराच्या पलीकडे एक प्रकाश आपल्याला नक्कीच प्रकाश दिसेल अशी आशा मला आहे”, असा विश्वासही प्रियाने व्यक्त केला आहे. तिची ही सोशल मिडियावरील पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. उशिरा का होईन मात्र तिने ही काम केल्याने नेटकऱ्यांनी तिचे कौतुकही केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!