Share

‘सामना’ मधील लेखावर भूषणसिंह राजे होळकर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Published On: 

मुंबई : सामनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करताना त्यांची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासोबत केली होती. यामुळे होळकर घराण्याचे भूषणसिंह राजे होळकर नाराज झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये आपली नाराजी व्यक्त केलीय.

या पत्रामध्ये भूषणसिंह राजे होळकर यांनी लिहिले की, ‘रयतेचे कल्याण हेच सर्वोपरी मानून संपुर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब, यांची तुलना राजकीय द्वेषातुन आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या आजच्या युगातील एका नेत्याशी कधीच होऊ शकत नाही.’

या पत्रात होळकर यांनी या लेखामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या मताचा जाहीर निषेध करत असल्याचेही म्हटले आहे. संजय राऊत यांनी लिहिलेल्या या लेखामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यात होळकर यांच्या या पत्रामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजपच्या वतीनेही या मुद्यावरुन शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुद्दा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!