🕒 1 min read
औरंगाबाद : एक काळ होता जेव्हा तृतीयपंथी या शब्दाबद्दल अनेक समज-गैरसमज प्रत्येकाच्या मनात होते. मात्र आता काळ बदलत आहे. मुंबई-पुणे यांसारख्या मेट्रो सिटीजमध्ये तृतीयपंथी समाज भिक्षुकीशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता औरंगाबाद शहरातही स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमात कंत्राटी पद्धतीने तृतीयपंथीयांना नोकरीवर सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे तृतीयपंथीयांमधून स्वागत करण्यात आले आहे मात्र मनात किंचीत भिती असल्याची भावना त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण तीन हजार तर शहरात दिड हजार तृतीयपंथीय आहेत. या लोकसंख्येतील ज्यांचे वय ५० च्या पुढे आहे जे थकलेले आहेत त्यांना सोडून १८ ते ५० या वयोगटातील तृतीयपंथीयांना नोकरी देण्याचा मनपाचा विचार आहे. यांच्यातील अनेक जण १२ वी, बीए, पदवीधारक आहेत ज्यांना संगणकीय ज्ञान, टायपिंग येते त्यानुसार करसंकलन, कम्प्युटर ऑपरेटर, ऑफीस वर्क अशा विविध स्तरावर त्यांना काम दिले जाणार आहे. मुख्यत: कुठलेही काम देण्याआधी त्यांना औपचारिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत आपण त्यांची दखल का घेतली नाही – रस्त्यावर भिक मागून खाणे कोणालाच आवडत नाही. जर त्यांनी अाजपर्यंत असे काम केले असतील तर ती त्यांची निवड नव्हती जगण्यासाठीची धडपड होती. औरंगाबाद मनपाने तृतीयपंथीयांना स्मार्ट सिटीत नोकरी देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय सकारात्मक असून त्यांच्यामधूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. त्यांची दखल घेण्यास उशिरच झाला मात्र अजूनही वेळ गेलेली नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांनी व्यक्त केले.
अतिशय सकारात्मक निर्णय – औरंगाबाद मनपाचा निर्णय अतिशय स्तुत्य आणि सकारात्मक आहे. काळ बदलत आहे. त्यामुळे आमच्यातील अनेकजण शिक्षित झालेत, अजूनही होत आहेत. प्राऊडली ब्रेड अँड बटर मिळवण्याची हि लढाई आहे. मात्र यात प्रशिक्षण देऊन नोकरी द्यायला हवी जेणेकरुन काम करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. इतर शहरातील महापालिकांनीही औरंगाबादचा आदर्श घ्यावा. आम्ही शिकतोय, आणि जर नोकरी करायला मिळाली तर याचा सर्वाधिक आनंदच होईल. अशा प्रतिक्रिया औरंगाबादच्या आमच्या समुदायातून आल्याचे तृतीयपंथी प्रतिनिधी न्याय हक्क कार्यकर्ता शमिभा पाटील यांनी सांगितले.
मनात किंचीत भिती, मात्र आनंद आहेच – हजार वर्षांपासूनच्या इतिहासात बदल होतोय याचा आनंद आहे. मात्र याआधी मुंबईत असा प्रयोग झाला होता त्यावेळी एकुणच कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण, अनेक वर्षांच्या सवयी बदलण्यास लागणार वेळ, न्यूनगंड यामुळे आमच्यातील अनेकांनी त्या नोकऱ्या सोडल्या. त्यामुळे नोकरी मिळाल्यानंतर ती टिकवणे हा मोठा संघर्ष ठरु शकतो. बाहेरच्या जगात मॅच होण्यासाठी पर्सनल डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स ट्रेनींग द्यायला हवी. असे मत तृतीयपंथी प्रतिनिधी रुद्र काळे याने व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला चांगलच ठाऊक ; मुश्रीफांचा टोला
- मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांना लाल दिव्याच्या गाडीची भलतीच हौस!
- धक्कादायक! अफगाणिस्तानच्या शाळेवर बॉम्बहल्ला, ६८ विद्यार्थिनींचा मृत्यू
- कोरोना संकटातही ‘लाईफ सेव्हिंग’ ऑक्सिजनचा काळाबाजार, ४९ सिलेंडर केले जप्त
- ‘कोरोनाचे संकट व संचारबंदी संपल्यावर मराठा समाजाची भूमिका वेगळी असेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
