🕒 1 min read
मुंबई : भाजपचे नेते राजभवन हे राजकीय आखाडा बनवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल ज्यापद्धतीनं राजकीय भाष्य करत आहेत, ते पाहता त्यांना राजकारणात रुची दिसते. त्यामुळे राजकारणात रुची असलेल्या राज्यपालांना पंतप्रधान मोदींनी पदमुक्त करावे आणि त्यांना निवडणूक लढवण्याची संधी देऊन मंत्री वा वेगळी जबाबदारी देऊ करावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
निवडणुकीनंतर देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर १८ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन @PMOIndia यांनी दिले होते. याची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबत @MamataOfficial यांनी एक पत्र लिहिले आहे. पण या घोषणेबाबत ना. @nawabmalikncp यांनी शंका उपस्थित केलीय. pic.twitter.com/5wCsSDVNIa
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 10, 2021
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेल्या हिंसाचाराबद्दलचा अहवाल देण्यास मनाई केली आहे. हिंसाचाराबाबतचा अहवाल राज्यपालांना देण्यात येणार होता. परंत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानुसार गृहसचिवांनी राज्यपालांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल दिला नाही. राज्यपालांच्या दाव्यानुसार डीजीपी आणि पोलिस आयुक्तांनी दिलेला अहवालही पुढे आणला गेला नाही.
https://twitter.com/jdhankhar1/status/1390245677553176576
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर १८ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. त्याची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी एक पत्र लिहिले आहे, असं मलिक यांनी सांगितलं. पण या घोषणेबाबतही मलिक यांनी शंका उपस्थित केली. कदाचित हा केवळ चुनावी जुमला होता असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांनी जनतेला सांगू शकतात. त्यामुळं जी घोषणा केली आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- ‘मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
