Share

‘मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले आहे असे वृत्त समोर आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा कोरोनाच्या मुद्द्यावरून भिडले आहेत.

‘मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता पंतप्रधान मोदी कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही’ असा दावाच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. ‘स्वःताच उदोउदो करत फिरायचं, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आलं की केंद्रावर ठकलायचं ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे. सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं’ असा टोला उपाध्ये यांनी लगावला.

‘कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, सारखं पंतप्रधानानी यांच कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट’ असंही उपाध्ये म्हणाले.

‘आता प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का? शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण टोपेंनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल जो खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे होते’ असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला. ‘वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ‘मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा’ असंही उपाध्ये म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!