Share

‘सर्व राज्यांना मोफत लस द्या’, ममता बॅनर्जींची सुप्रीम कोर्टात याचिका

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने लस उपलब्ध करून द्यावी. तसेच राज्यांना ती मोफत द्यावी, अशी मागणी करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशात लसींच्या किंमतीत प्रचंड तफावत असून ती दूर करण्याची मागणी ममता सरकारने केली आहे.

देशात १ मे पासून १८ हून आधिक वयाच्या सर्वच नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. अनेक राज्य सरकारनी लसींच्या किंमतीवरून नाराजी व्यक्त केलीये. याच घटनाक्रमात केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर तीव्र आक्षेप घेत बंगाल सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. राज्यांना लसींचा पुरवठा केला जात नाहीय. त्यामुळे लसीकरण मोहिम राबविण्यात अडथळे उत्पन्न होत आहेत. तसेच लस खरेदी करण्यास राज्य सरकार असमर्थ आहे. म्हणून आम्हाला मोफत लस देण्यात यावी, असा आग्रह बंगाल सरकारने आपल्या याचिकेत केला आहे.

त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे स्थित सिरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक कंपनीने कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसींचे उत्पादन सुरु केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राला विविध दराने लस विक्री सुरु केली आहे. त्यावर बंगाल सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!