Share

कोरोना विरुद्धच्या लढ्यात मुंबई इंडियन्सचा ‘हटके’ संदेश; सॅनिटायझर बॉटलचा फोटो केला ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने हटके अंदाजात कोरोना जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई इंडियन्सने एक सॅनीटायझरच्या बाटलीचा फोटो पोस्ट केला आहे. या बाटलीच्या मध्यभागी एक व्यक्ती सोफ्यावर बसलेला असुन त्याच्या हातात मोबाईल आहे. तिथे एक छोटे रोपटे देखील आहे आणि या बाटलीवर लिहीलेले आहे स्टे होम. या फोटोला कॅप्शनमध्ये लिहीले आहे की,’घरी रहा, हात धुवत रहा आणि कोरोनाचे सर्व नियम पाळा’ असे लिहीले आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. स्पर्धेदरम्यान आयपीएलच्या आजी माजी खेळाडूंनी कोरोनाच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर सचिन तेंडुलकर, हार्दिक आणि कृणाल पंड्या, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन अशा काही भारतीय खेळाडूंनी मदतीचा हात पुढे केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!