Share

एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्रिपदी विराजमान; सर्व रेशनकार्डधारकांना मिळणार 2 हजारांची मदत

Published On: 

चेन्नई – द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांच्या सह अन्य 33 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्षानं मोठा विजय मिळवला.द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचे पुत्र असलेले स्टॅलिन हे प्रथमच मुख्यमंत्रीपदी आले आहेत.

करुणानिधी यांच्या 2018 मध्ये झालेल्या निधनानंतर स्टॅलिन यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. स्टॅलिन हे 1989 पासून पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.ते 2009 मध्ये राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री बनले होते.

दरम्यान,द्रमुकने प्रचारादरम्यान सर्व रेशनकार्डधारकांना प्रत्येकी 4 हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. या आश्वासनानुसार एम. के. स्टॅलिन यांनी रेशनकार्डधारकांना २ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. त्यामुळे तामिळनाडूमधील 2,07,67,000 रेशनकार्डधारकांना एकूण 4,153.69 कोटी रुपये मिळणार आहेत.

सरकारकडून पुरविण्यात येणारे आविन या दुधाचे दर 3 रुपयांनी कमी केले आहेत. या निर्णयाची 16 मे पासून अंमलबजावणी होणार आहे. तामिळनाडूच्या सरकारी बसचा प्रवास महिलांसाठी मोफत असणार आहे. या निर्णयाची शनिवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 1,200 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत.

तुमच्या मतदारसंघात मुख्यमंत्री’ ही योजना राबविण्यासाठी स्वतंत्र विभाग आणि त्यासाठी आयएएस अधिकारी नेमण्याचा निर्णयही एम. के. स्टॅलिन यांनी मंजूर केला आहे. या योजनेंतर्गत मुख्यमंत्री स्टॅलिन 100 दिवसांमध्ये निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!