Share

सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही

Published On: 

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्यात. पण सोलापूरकर अजूनही कोरोनाबाबत जागरूक नाहीत, असेच दिसून येते. बुधवारी तब्बल एकाच दिवसात ४९९ जणांवर विनामास्क फिरल्याबद्दल कारवाई झाली आहे. तर तब्बल २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

म्हणजे जवळपास तीन लाखांचा दंड भरू. पण मास्क लावणार नाही, अशी स्थिती सोलापूरकरांची आहे. असे या दंडात्मक कारवाईवरून दिसते. विनामास्कसोबतच एकूण आठ दुकानांवर तर ३०८ वाहनांवरती दंडात्मक कारवाई झाली आहे. एकूण ३ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सोलापूर शहरामध्ये दररोज ८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते. तर शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य नाक्यांवरतीही नाकाबंदी असते. सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एकूण कारवाई मोहिमेदरम्यान तीन लाख ८६ हजार ९०० रुपये दंड सोलापूरकरांनी भरला आहे. त्यात तब्बल ४९९ जणांवर विनामास्क कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावरून सोलापूरमधील नागरिकांना नियम पाळण्याचे सल्ले देण्यात येत आहेत. ‘तुम्ही लाख दंड भराल, पण कोरोनापासून कसे बचावणार?’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!