Share

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा १३ वा सिझन लवकरच सुरू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत अनेक भागांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनचा फटका सिनेमा आणि टीव्ही मालिकांना बसला. सध्या महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली नसल्याने अन्य ठिकाणी जाऊन चित्रीकरण केले जात आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला थोडा दिलासा मिळाला आहे.

या दरम्यान कोरोनाच्या या संकटकाळामध्ये प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वांचे आवडते महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा १३ वा सिझन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर याबाबतची पोस्ट शेअर करत सांगितले की, ‘पुन्हा एकदा अमिताभ बच्चन घेऊन येत आहेत केबीसीसाठी लाखमोलाचे प्रश्न. तर फोन उचला आणि तयारीत राहा कारण नोंदणीला १० मे पासून सुरुवात होणार आहे. #KBC१३ ची नोंदणी.’ या  पोस्टमुळे आता अनेकांना या कार्यक्रमाची  उत्सुकता लागली आहे.

गेल्यावर्षी देखील कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण काळजी घेऊन केबीसीचे चित्रिकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करण्यात आले होते. ‘कौन बनेगा करोडपती ‘ हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. दरवर्षी या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांचे स्वप्न पूर्ण होते, सोबतच अमिताभ बच्चन यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळते. या कार्यक्रमात स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. अनेक स्पर्धक कठीण परिस्थितीतून मार्ग काढत या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या बुद्धीच्या जोरावर लढतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!