Share

मोठी बातमी : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं करोनानं निधन

Published On: 

🕒 1 min read

मुजफ्फरनगर : देशभरात सध्या कोरोनाने ठेईमान घातले आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक सेलिब्रेटी,खेळाडू यांच्यासह अनेक मोठे नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. यात आता राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं करोनामुळे निधन झालं असल्याचे वृत्त समोर आले आहे.

२२ एप्रिल रोजी अजित सिंह करोना संक्रमित असल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, फुफ्फुसात संक्रमण पोहचल्यानं त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. पुढे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते.

अजित सिंह बागपत येथून सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. याशिवाय केंद्रात त्यांनी नागरी उड्डाण मंत्रीपद भूषवलं होतं. राजकारणात येण्याआधी अजित सिंह अमेरिकेत नोकरी करत होते. १५ वर्ष तिथे नोकरी गेल्यानंर आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी ते पुन्हा भारतात परतले होते. १९८६ मध्ये सर्वात प्रथम ते राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!