Share

मे महिन्याच्या शेवटी होणार पोलीस भरती; राज्य सरकारच्या आधीच महाराष्ट्र पोलिसांची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अनेक महिन्यांपासून रखडली आहे. २०१८ मध्ये प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांनाही अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. मात्र, आता या महिन्याच्या अखेरीस पोलीस भरती होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आधीच महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे आश्चर्यदेखील व्यक्त केले जात आहे.

मराठा आरक्षण न्यायालयात अडकल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने होणाऱ्या भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. यात काही विद्यार्थ्यांनी लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली होती, तर काही विद्यार्थी मराठा आरक्षणाचा निकाल लागू द्यावा, या मताचे होते. मात्र, या सर्वात अनेक विद्यार्थी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रतिक्षा करत आहेत.

आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या वतीने सोशल मीडियावर मे महिन्याच्या अखेरीस भरती प्रक्रिया होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!