Share

क्लिन बोल्ड होताच विराटच्या नावे नकोसा विक्रम; सर्वाधिक क्लिन बोल्ड होणाऱ्या फलंदाजाच्या यादीत मिळाले स्थान

Published On: 

आहमदाबाद : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

पंजाब किंग्सच्या १८० धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा हरप्रित ब्रार टाकत असलेल्या आकराव्या षटकातील पहिल्या चेंडुवर त्रिफळाचीत झाला. विराट कोहलीची आयपीएलमध्ये त्रिफळाचीत होण्याची ही ३२ वी वेळ होती. आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा त्रिफळाचीत होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत होण्याच्या यादीत पहिल्या स्थानी शेन वॉटसन आहे. वॉटसन हा ३५ वेळा त्रिफळाचीत झाला आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन असुन तो ३३ वेळा त्रिफळाचीत झाला आहे. या सामन्यात पंजाबच्या धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाला पराभव स्विकारावा लागला. आरसीबीकडून सर्वाधिक धावा या कर्णधार विराट कोहलीने ३४ चेंडुत ३ चौकार आणि १ षटकारासह ३५ धावांची खेळी केली. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!