Share

कोरोनाविरोधातील लढाईत चीनचा भारताला मदतीचा प्रस्ताव

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी देशात जवळपास साडेतीन लाख कोरोना रुग्ण आढळून आलते. गेल्या सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे आढळून येत आहे. देशात आरोग्यसेवा कमी पडू लागल्या आहे, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता चीन ने भारताला मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवत मदतीचा प्रस्ताव दिला आहे. भारतातील चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

चीन भारताबरोबर महासाथीच्या विरोधात सहकार्य मजबूत करण्यास आणि देशाला पाठबळ व सहकार्य देण्यासाठी तयार असल्याचं जिनपिंग यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कोरोनाच्या महासाथीविरोधात लढण्यासाठी चीन भारताला हवी ती मदत करण्यास तयार आहे. तसंच चीनमध्ये तयार करण्यात आलेली महासाथीच्या विरोधातील सामग्री जलदगतीनं भारताला पोहोचवली जात आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी गुरुवारी सांगितले होते.

चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी ट्वीट करून मदतीचा हात पुढे केला आहे. ‘कोरोना विषाणू हा मानवाचा शत्रू आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्क होऊन याचा सामना करण्याची गरज आहे. चीन भारत सरकार आणि तेथील नागरिकांचं महासाथीच्या लढाईत सोबत आहे,’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे तर ‘भारत ज्या आव्हानांचा सामना करत आहे त्याप्रती चीन संवेदना व्यक्त करतो आणि त्याबद्दल सहानुभूतीही आहे,’ असं वांग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!