🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनच्या नियमांत १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. या लॉकडाऊनच्या काळात गोर-गरिबांना मोफत भाेजन देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यासाठी शिवभोजन थाळी दोन महिने मोफत मिळणार आहे. मात्र, याच शिवभोजन थाळीबाबत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी विचित्र योगायोग जुळवला आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, ‘शिवभोजन थाळीसाठी ५५०० कोटींचं पॅकेज, पुढचे २ महिने शिवभोजन थाळी मोफत… मुख्यमंत्र्यांची घोषणा…केंद्र सरकार दोन महिने गहू तांदूळ मोफत देणार आहे आणि शिवभोजन थाळी ही दोन महिने मोफत मिळणार आहे… काय विचित्र योगायोग आहे नाही…’
शिवभोजन थाळीसाठी ५५०० कोटींचं पॅकेज, पुढचे २ महिने शिवभोजन थाळी मोफत… मुख्यमंत्र्यांची घोषणा…
केंद्र सरकार दोन महिने गहू तांदूळ मोफत देणार आहे आणि शिवभोजन थाळी ही दोन महिने मोफत मिळणार आहे… काय विचित्र योगायोग आहे नाही…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 30, 2021
यामध्ये शिवभोजन थाळीबाबत भातखळकर यांनी कोणताच प्रश्न विचारला नसला तरी त्यांचा इशारा कोणत्या बाजूने आहे, हे लगेच लक्षात येते. शिवभोजन थाळीबाबत आधीपासूनच भाजपच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामध्ये मोठा भ्रष्ट्राचार होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते- उद्धव ठाकरे
- लॉकडाऊन लावलाय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही – मुख्यमंत्री ठाकरे
- पुण्यासाठी पीएम केअर्स फंडातून मिळाले ३० व्हेंटीलेटर्स; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- महाविद्यालयांत लसीकरण केंद्र सुरू करा! अभाविपची मागणी
- Breaking : याहून अधिक कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
