Share

राज्यात वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा खेचून नेतायत; फडणवीसांचा आरोप

Published On: 

नाशिक : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केल्यानंतर राज्याला सर्वाधिक रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीवर नाशिक दौऱ्यावर असलेल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

‘ऑक्सिजनची समस्या सुटण्यासाठी आम्ही प्रशासनाला मदत करत आहोत. देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला गेला आहे. त्याचं नियोजन राज्य सरकारने केलं पाहिजे. मात्र, बलशाली नेते आपल्या भागात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन खेचून नेत आहेत. मंत्री आणि वजनदार नेते आपल्या भागात पुरवठा अधिक करुन घेत आहेत हे अयोग्य आहे. सरकारने औषध आणि इतर सुविधांचे वाटप समान प्रमाणात करावे,’ अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

यासोबतच त्यांनी नाशिकमधील परिस्थितीबाबत देखील भाष्य केलं आहे. ‘नाशिक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा जास्त आहे. नाशिकमध्ये रेमडेसिवीरचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे. आमचा प्रयत्न आहे की, अधिक रेमडेसिवीर उपलब्ध करुन द्यावेत. सफाई कर्मचाऱ्यांची सुद्धा भरती करण्यात यावी. पीएम केअर फंडातून नाशिकला 4 प्लॅन्ट, नाशिकला अतिरिक्त 2 ऑक्सिजन टँकर्स रिलायन्स आणि जिंदालकडून मिळणार आहेत आणि या संदर्भात आम्ही स्वत: प्रयत्न करुन संवाद करुन दिला.’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!