Share

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव; गेवराई तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

Published On: 

बीड: कोरोनाचा शिरकाव आता ग्रामीण भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून येथील स्थानिक प्रशासन आवश्यक ते सर्व उपाय करत असून नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. गेल्या आठ दिवसांपासून सिरसमार्ग येथे कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यातील सिरसमार्ग येथे मागील आठ दिवसांत मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. यामध्ये सिरसमार्ग व तरटेवाडी मिळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत गावातील कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रकटे यांनी केले आहे.

सिरसमार्ग येथे आरोग्य विभागाच्या वतीने लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी गुरुवारी गावात अँटिजन टेस्टिंग मोहिम राबवण्यात आली. याप्रसंगी डॉ.रकटे या बोलत होत्या. ग्रामविकास अधिकारी कुडके, माजी सरपंच व गेवराई खरेदी विक्री संघाचे संचालक सोमेश्वर गचांडे तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी एकूण ८८ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दहा जणांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह रुग्णांना पुढील उपचारासाठी गेवराई येथे पाठविण्यात येणार आहे.

दोन्ही गावातील नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्क वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले. कोरोनावर मात करण्यासाठी निर्जंतुकीकरण मोहिमेची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने लवकरच गावात ब्लिचिंग फवारणी केली जाणार आहे. ग्रामस्थांनीही नियम पाळत सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!