🕒 1 min read
नाशिक : १ मे पासून देशात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तर, जनतेला आर्थिक अडचण येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने मोफत लसीकरण करण्याचे ठरवले आहे. मात्र, लसींचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने राज्यात १ मे पासून लसीकरण करण्यास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असमर्थता दर्शवली आहे.
आवश्यक साठा उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरण सुरु केली जाईल असे राजेश टोपेंनी जाहीर केलं आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी याबाबत प्रश्न केला असता लसींच्या साठ्याबाबत आरोग्यमंत्र्यांची भूमिका बरोबरच आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘देशातील लसींच्या साठ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला ३ हजार कोटी आणि भारत बायोटेकला १५०० कोटी दिले आहेत. यामुळे देशात लसनिर्मितीची संख्या वाढलीये. मे महिन्याच्या अखेर पासून सीरम दरमहा दहा कोटी लस तयार करतील. भारत बायोटेक सध्या ३ कोटी आणि ऑगस्ट अखेर पासून ६ कोटी लस निर्मिती करेल. त्यामुळे आता देशात इतक्या लस तयार होत असून बाहेरून देखील अधिक साठा मागवण्यात येईल. त्याचा नेमका आकडा मला माहिती नाही. देशात एवढ्या प्रमाणात लस निर्मिती केली जात असल्याने आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण करत आहोत,’ अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, ‘अधिक वेगाने लसीकरण करण्यासाठी केंद्राने स्पष्ट भूमिका घेतलीये. अधिक लसीकरण करण्यासाठी राज्यांना मुभा देण्यात आली आहे. केंद्र सरकार लसींच्या ५० टक्के साठा स्वतः विकत घेऊन राज्यांना देणार आहे. तर, ५० टक्के साठा हा राज्य सरकारने घ्यावा असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य आपली मागणी बुक करत आहेत. आता लस निर्मिती वाढवण्यात आल्याने अधिक लस उपलब्ध होतील. त्यामुळे या लसी राज्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, जसा लसींचा साठा येईल, तसा ते पुढचा निर्णय घेतील हे योग्यच आहे.’ असं सविस्तर भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/415033129654281/
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचं ठरलंय’ नंतर कोल्हापुरात आता ‘गोकुळ चांगलच चाललंय’ पॅटर्नची चर्चा !
- ‘अडचणीच्या काळात भारताला मदत करताना अमेरिकेला समाधान वाटतंय’
- राज्य संकटात : कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कोट्यावधींची मदत
- तुळजापुरात लसीकरणाला ‘ब्रेक’, दोन केंद्र बंद
- कोरोनाला हरवण्यासाठी इंदोरीकर महाराजांनी सांगितला ‘रामबाण’ उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
