Share

दवाखान्यातून सुटताच शरद पवारांचे पत्र अन् राष्ट्रवादीने उघडली तिजोरी !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांना यामुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. अशात घटलेला महसूल, मोफत लसीकरण आणि गरुजांना केलेली मदत यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येत आहे. हे संकट पाहून आता अनेक खेळाडू, नेते, अभिनेते यांनी सरकारला मदत केली आहे. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे वेतन आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. तर अभिनेता अजय देवगण, ऑस्ट्रेलियाचे खेलाडू पॅट कमिन्स, ब्रेट ली यांनी देखील भारताच्या या संकट काळात मदतीचा हात दिला आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे एक कोटी तर पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायत फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे. कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या. दिरंगाई न होता तातडीने ही मदत मिळावी यासाठी शरद पवारांनी एका कागदाच्या कोपऱ्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या होत्या.

आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी मुंबई युवती काँग्रेसच्या अध्यक्ष अदिती नलावडे उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!