Share

पेठ बीड येथे जुगार अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत, सात जण फरार

Published On: 

बीड: शहरात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे अनेकांना काम मिळत नाहीये तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. अशा वेळेस पैश्यांसाठी अनेकदा चुकीचा मार्ग निवडला जातो. त्यातलाच एक भाग म्हणजे चोरी, जुगार, लुटमार व अन्य गुन्हेगारी प्रकार. शहरातील पेठ बीड भागात अशाच एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून तिघांना अटक केली आहे.

बीड शहरातील पेठ बीड भागात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून तिघांना पकडले असुन अन्य सात जण फरार झाले आहेत . गुरुवार ही कारवाई करण्यात आली असून दुपारी सव्वाचारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. शहरात संचारबंदी असल्याने गर्दी कमी असल्याने शहरातील पेठ बीड भागातील भावसार सभागृहाच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात हा जुगार अड्डा सुरु होता. या जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी भावसार सभागृहामागील मोकळ्या मैदानात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला.

पोलिसांनी अचानक छापा मारल्यामुळे तेथील जुगार खेळणारे आरोपी गोंधळून गेले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. या पळापळीत जुगार खेळत असलेल्यांमधील तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले मात्र त्यातील सात जण फरार झाले आहेत. दीपक राजपूत, अतुल महामुनी, जितेंद्र पिल्ले असे अटक झालेल्यांची नावे आहेत. यावेळी ७ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!