उस्मानाबाद: जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आलेली असताना सुद्धा काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे. कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी ग्रामीण भागात अचानक भेटी देण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी यांच्या कोविड संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करताना निदर्शनास आलेल्या १४ व्यावसायिकांच्या दुकाने सील करण्यात आल्या. त्यामुळे व्यावसायिकांंमध्ये खळबळ उडाली आहे.
तालुक्यात कोरोनाचा आकडा चार हजारांचा पल्ला पार करून गेला आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात वाढीचा वेग जास्त आहे. गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.यात प्रामुख्याने किराणा, भाजीपाला, फळ, दूध, मिठाई, आदी अत्यावश्यक अनुषंगिक दुकानांना केवळ सकाळी ७ ते ११ या काळात सुरू ठेवता येणार आहे.
एकूणच अत्यावश्यक बाबी वगळता इतर आस्थापना तर पूर्णपणे बंद राहतील, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. असे असताना काही व्यावसायिक प्रशासनाचे हे नियम ‘धाब्यावर’ बसविण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी कोरोनावर मात करीत नुकतीच पुन्हा कामकाजास सुरुवात केली आहे. त्यांनी आता ग्रामीण भागात अचानक भेटी देण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- निलेश लंके तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत याचा आम्हाला अभिमान – सुप्रिया सुळे
- ‘राज्य सरकारवर दुजाभाव केल्याचा आरोप करणे म्हणजे पुण्यातील भाजप नेत्यांचा निव्वळ बालीशपणा’
- जालन्यात पालिकेच्या कर विभागाला आग; महत्वाचे कागदपत्रे जळून खाक
- लसीकरणावरून राज्य सरकारवर भाजपची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; काँग्रेसचं प्रत्युत्तर
- राज्य संकटात : कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कोट्यावधींची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
