अहमदनगर : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही भयानक असून देशात विक्रमी रुग्णांची नोंद केली जात आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, आवश्यक औषधे यांचा गंभीर तुटवडा झाल्यामुळे रुग्ण अक्षरशः तडफडून प्राण सोड आहेत. मात्र, अशा स्थितीत कोरोनाला हरवण्यासाठी योग्य खबरदारीचा आवश्यकता आहे.
कोरोनाचा मोठा दुष्परिणाम शरीरावर तर होतोच मात्र कोरोना विरुद्धची लढाई माणूस जेव्हा मनातून खचतो तेव्हाच हरतो. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आता रामबाण उपाय सांगितला आहे. ते लोणी येथे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
‘हात वारंवार धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीसोबत मनाता खंबीरपणा ठेवणे हे चौथे सूत्रही आता कोरोनाला हरविण्यासाठी आवश्यक बनले आहे, भीती आणि मनाचा दुबळेपणा हा करोनापेक्षा भयंकर रोग आहे. कोरोनाच्या संकटाने मानवी जीवन क्षणिक करून टाकले आहे,’ असं इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत.
यासोबतच, ‘कोरोनाच्या संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली. पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला.रुग्णाला माणसाची आणि समाजाची गरज वाटू लागलीय. त्यामुळं आताआरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. मला करोना होणार नाही हा दृष्टिकोन नव्हे तर मी स्वत:ला कोरोना होऊ देणार नाही हा दृष्टिकोन आपल्याला ठेवावा लागेल असा रामबाण उपाय इंदोरीकर महाराजांनी सांगितलाय. तसेच, आज पर्यंत विविध अवतारातून माणसाला समज मिळाली आहे. आता माणसाला माणुसकी काय आहे ? हे दाखविण्यासाठी कोरोनाला याव लागलंय,’ असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचं ठरलंय’ नंतर कोल्हापुरात आता ‘गोकुळ चांगलच चाललंय’ पॅटर्नची चर्चा !
- ‘अडचणीच्या काळात भारताला मदत करताना अमेरिकेला समाधान वाटतंय’
- राज्य संकटात : कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कोट्यावधींची मदत
- तुळजापुरात लसीकरणाला ‘ब्रेक’, दोन केंद्र बंद
- ‘चमकोगिरी करण्याची हौस किमान कोरोना साथीच्या काळात तरी बाजूला ठेवायला हवी’

