🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. याच कोरोनाच्या सावटाखाली भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेदरम्यान अनेक विदेशी खेळाडूंनी स्पर्धा मध्येच सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तसेच काही आजी माजी क्रिकेटपटूंनीही स्पर्धेतून कोरोनामुळे माघार घेतली. याच पार्श्वभूमिवर भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात खेळण्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील(बीसीसीआय) क्रिकेट विकास व्यवस्थापक आणि विश्वचषकाचे संचालक धिरज मल्होत्रा यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणले आहे की, ‘टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल नक्की काय होईल, हे आताच सांगणे अती घाईचे ठरेल. मात्र जर अशी वेळ आली तर पर्यायी योजना म्हणून हा विश्वचषक युएईत हालवण्याचा विचार चालू आहे. पण असे झाले तरीही, यजमानपद बीसीसीआयकडेच राहणार आहे,’ असे मल्होत्रा यांनी सांगितले आहे.
१८ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या काळात भारतात टी२० विश्वचषक २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. परंतु भारतातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आयसीसी टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीत (युएई) हलवण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयने मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, हैदराबाद, धरमशाला, अहमदाबाद आणि लखनऊ या भारतातील वेगवेगळ्या शहरात विश्वचषकातील सामने खेळवण्याचे त्यांनी ठरवले होते. यादरम्यान आयसीसी सध्या भारतातील कोविडच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणारांनो सावधान ! लाॅकडाऊनची नांदेडमध्ये कडक अंमलबजावणी सुरु
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?
- राजस्थान विरुद्धच्या सामन्यात इशानला संघाबाहेर केल्याने ब्रायन लारा नाराज
- नजर चुकवून कोरोना बाधितांच्या वार्डात जात होते नातेवाईक, महापौरांनी दिले आता ‘हे’ आदेश
- उस्मानाबादेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाताला लाल फिती बांधून रेड अलर्ट आंदोलन

