नांदेड : शहरासह जिल्ह्याभरामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांची विशेष बैठक घेतली आणि कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी चौकाचौकामध्ये पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे. तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची सुरुवात देखील करण्यात आली आहे. कोराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १४ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू केले आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळाव्यात तसेच छोटे व्यापारी, किराणा, भाजीपाला, औषधी यांची सोय व्हावी, या साठी शहरामध्ये ७ ते ११ या वेळेची मुभा देण्यात आली आहे. तरीही नागरिक काही ना काही कारण सांगून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फिरताना आढळून येत आहेत.
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसावा तसेच कोरोना संसर्ग रोखला जावा. या साठी पोलिसांनी या वेळी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या करिता शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोलिसांचा ताफा ऊभा करण्यात आला आहे. या ताफ्यातील पोलिस विनाकारण फिरणाऱ्यांना विचारणा करुन खुपच अत्यावश्यक असेल तरच सोडणार आहेत. आणि विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई देखील करणार आहेत. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर फिरु नये, तसेच अत्यावश्यक काम असेल तर मास्क घातल्याशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडू नये, अन्यथा चौकाचौकावर उभे असणारे पोलिस तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आवाहन देखील जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विनाविलंब द्या,प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे’
- सुनील माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सखोल चौकशी एनआयए करणार ?
- पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेट बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- कौतुकास्पद ! जिल्हा परीषद शाळेच्या मुख्याध्यापकाची लसीकरण जनजागृतीसाठी दुचाकीवरून भटकंती
- अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती


