दिल्ली : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघावर ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने १७२ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने ३ गडी गमावत एकोणीसाव्या षटकात पार केले. मुंबईचा सलामीवीर क्विटंन डिकॉकला ७० धावांसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने मधल्या फळीतील फलंदाज इशान किशनला या सामन्यात बाहेर बसवुन नाथन कुल्टर नाईलला संधी दिली. कर्णधार रोहितच्या या निर्णयावर अनेक आजी माजी खेळाडूंनी नाराजी दर्शवली. वेस्ट इंडिजचे महान खेळाडू ब्रायन लारानेही आपली नाराजी व्यक्त करत म्हणाले की, ‘ मुंबईने स्पर्धेतील आतापर्यंतचे सामने हे चेन्नईच्या खेळपट्टीवर खेळले आहेत. या सामन्यात जवळपास मुंबईचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले. यादरम्यान डिकॉक अपयशी होत असताना त्याच्या जागी तुमी ख्रिस लिनला एकही संधी दिली नाही. मात्र इशान किशन अपयशी होत असताना तुम्ही त्याला संघाबाहेर केले. जर मी रोहितच्या जागी असतो तर त्याला नक्कीच संधी दिली असती.
ब्रायन लाराने इशान किशनला मॅच विनर खेळाडूची उपमादेखील दिली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ५ सामन्यात इशान किशनने अवघ्या ७३ धावा केल्या आहेत. यात २८ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगीरी केल्यामुळे त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाताला लाल फिती बांधून रेड अलर्ट आंदोलन
- ‘१ मे नंतर लस मिळाली नाही तर आरोग्यमंत्री राजीनामा देतील का?’
- भावी पत्नीसमोर बळी मिळवताच राहुल चाहरला आनंदाश्रू ; तिनेही केले टाळ्या वाजवुन कौतुक
- नागरिकांचा जीव वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य : नितीन गडकरी
- महिला सरपंचांच्या पतीने घेतली २० हजारांची लाच; एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहाथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
