Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?

Published On: 

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण असो, लॉकडाऊन असो किंवा सरकारची विविध धोरणं असोत, तसेच कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची सरकारची तयारी यासंदर्भात मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधून राज्यामध्ये असलेल्या कोरोना परिस्थिती बाबत जनतेला माहिती देणार आहेत. तसेच उद्यापासून राज्यांमध्ये पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागचे कारण या संवादादरम्यान मुख्यमंत्री जनतेला सांगणार आहेत.

यासोबतच सध्या राज्यात सुरू असलेला कडक लॉकडाऊनचा नेमका काय परिणाम समोर आला आहे? लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर आवर घालण्यात राज्य सरकारला कितपत यश आले? याचीदेखील माहिती मुख्यमंत्र्यांकडून दिली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे शासनाच्या उपाययोजना कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. राज्यात ऑक्सिजन आणि बेड चा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळी मुख्यमंत्री जनतेला काय बोलणार  हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!