उस्मानाबाद: कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यातच ऑक्सिजन, रेमडेसेविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आसल्याने रुग्णांचे हाल होत, असून मृत्युंच्या संख्येत ही वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रेणेवर प्रंचड ताण पडला आहे. आरोग्य सेवकांचे कोरोना कालावधीत पहिल्या लाटेपासून अविरत सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सेवेत कायम करावे, या मागणीसाठी मुरूम येथील कोव्हिड केअर सेंटरमधील कंत्राटी कामगारांनी हाताला लाल रिबीन बांधून रेड अलर्ट आंदोलन केले.
कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आक्षरता आरोग्य यंत्रणा हतबल झाली असुन आरोग्य यंत्रणाचा तुटवडा भासत आहे त्यातच आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस कोरोना रुग्णांचे काम करत आहे रुग्णांची वाढती संख्यामुळे कर्मचारी हतबल झाली आहे. मुरूम येथे रिक्त पदावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आले आहे हे न केल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी रेड अलर्ट आंदोलन पुकारले आहे. तसेच यामध्ये राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी सहभागी होईल.
सध्या कोरोना दिवसात आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेले योगदान कौतुकस्पाद आहे. मुरुम येथील कोव्हिड सेंटरवर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ही रजा न घेता काम करत आहे. दि.२६ ते २९ एप्रिल दरम्यान हाताला लाल रिबीन बांधून हे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोव्हिड महामारी योद्धा संघर्ष समितीचे प्रमुख संतोष भांडे यांनी दिला आहे. मुरूम येथील कोव्हिड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांनीही हाताला लाल रिबीन बांधून रेड अलर्ट आंदोलन केले.
महत्वाच्या बातम्या
- थोरात देणार एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, राज्यातील इतर आमदार अनुकरण करणार का ?
- पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेट बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- परप्रांतीयांविषयी राज ठाकरेंची ‘ती’ सुचना अखेर उद्धव ठाकरेंना ऐकावीच लागली
- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; ट्रक चालक फरार
- भारताला अमेरिकेचा मदतीचा हात ; मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
