Share

मुख्यमंत्री उद्धवजी सांगा गरिबांनी जगायचं कस?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात १४ एप्रिल पासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यातही घोषित केलेले आर्थिक पॅकेज अद्याप देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत गरिबांनी जगायचं कस? असा प्रश्न भाजप नेते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांना प्रश्न विचारले आहेत.

उपाध्ये यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. यामध्ये त्यांनी म्हटले की,  ‘मुख्यमंत्री उद्धव ठकारे सांगा गरिबांनी जगायचं कस? १४ एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा… ५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये तर १२ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही.. संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज १५ दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहिये.’

राज्यात कोरोना रुग्ण संख्या अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलाय. त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केलीय. त्यामुळे लॉकडाऊन हाच पर्याय आहे. मात्र, त्यात गरिबांचे हाल होत आहे. राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!