Share

लोकप्रिय पत्रकार रोहित सरदाना याचं निधन, कोरोना उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : टेलिव्हिजन क्षेत्रातील नावाजलेले पत्रकार रोहित सरदाना याचं हृदयविकाराच्या झटक्याने आज दुपारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोणाची लागण झालेली होती. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे सहकारी सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘जितेंद्र शर्माचा फोन थोड्या पूर्वी आला होता. तो जे बोलला ते ऐकून माझे हात थरथर कापू लागले. आमचा मित्र आणि सहकारी रोहित सरदाना यांच निधन झाले आहे. हा विषाणू आपल्या जवळच्या एखाद्यास घेवून जाईल, याची कल्पनाही केली नव्हती. मी यासाठी तयार नव्हतो. हा देवाचा अन्याय आहे … ॐ शांती. ‘ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली.

रोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मीडिया क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक पत्रकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी ट्विटद्वारे त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!