बडोदा – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विविध राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.सर्वसामान्य नागरिकांसह,अनेक नेते,खेळाडू,कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकून मृत्युमुखी पडत आहेत.
यातच आता बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं अवघ्या 34 व्या वर्षी निधन झालं. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.
जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदक पटकावले होते. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.
नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याचं निधन झालं. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजस्थान विरुद्धच्या सामन्यात इशानला संघाबाहेर केल्याने ब्रायन लारा नाराज
- महिला सरपंचांच्या पतीने घेतली २० हजारांची लाच; एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहाथ
- पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेट बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- थोरात देणार एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, राज्यातील इतर आमदार अनुकरण करणार का ?
- अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती

