🕒 1 min read
चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ याने भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षाने माझा नंबर लीक केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ५००हून अधिकवेळा त्याला व त्याच्या कुटुंबाला बलात्कार आणि हत्येची धमकी देणारे फोन मला आले, असं सिद्धार्थने म्हटलं आहे.
रंग दे बसंती मधील ऍक़्टर सिद्धार्थचा मोबाइल नंबर मध्यंतरी लीक झाला आणि या लीक झालेल्या मोबाइल नंबरवर त्याला मारण्याच्या धमक्या दिल्या जायला लागल्या आहेत. सिद्धार्थने आपला मोबाइल नंबर लीक केल्याबद्दल तमिळनाडूच्या भाजप आयटी सेलला जबाबदार धरले आहे.
याप्रकरणी सिद्धार्थने थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करत याबाबत ट्वीट केलं आहे. ‘भाजप सदस्याने माझा फोन नंबर लीक केला होता. गेल्या २४ तासात मला आणि माझ्या परिवाराला ५००हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत,’ असं सिद्धार्थनं ट्वीटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/Actor_Siddharth/status/1387657671826837505?s=20
तसंच, ‘सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन, डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत. ते मी पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा,’ असं सिद्धार्थने ट्विटमध्ये म्हटलं आहे. सिद्धार्थने याला राजकारणाचा एक भाग मानले आहे. तमिळनाडूमध्ये अलीकडेच निवडणुकांच्या वातावरणात कोविड-19 विरोधात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टिप्पणी सिद्धार्थने केली होती. त्याच्या या वक्तव्यावर नाराज होऊन भाजपनेच त्याचा मोबाइल नंतर लीक केल्याचा आरोप त्याने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विवाह समारंभावर धडक कारवाई, ५० हजारांचा दंड वसूल,रिसॉर्ट सिल
- पृथ्वी शॉच्या तडाख्यानंतर दिल्लीचा केकेआरवर ७ गडी राखुन दणदणीत विजय
- मुंबईत लसींचा तुटवडा, आजपासून पुढचे तीन दिवस लसीकरण बंद !
- कोरोनाची तिसरी लाट येईल,आताच नियोजन करा ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- पोलीसांनी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करा;आरोग्यमंत्र्यांच्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

