मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे.
निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते.
राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केले. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितल आहे.
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे, पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे, मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल. तसेच जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पोलीसांनी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करा;आरोग्यमंत्र्यांच्या सूचना
- वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, विविध भागातून चार दुचाकी लंपास
- खंडणीसाठी व्यापाऱ्यास मारहाण करून २ लाख रूपये लांबवले
- नगर परिषद कर्मचारी करणार एक मे पासून कामबंद आंदोलन
- कोरोना लसीकरणाला वेग येताच पैठणमध्ये लसीचा तुटवडा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
