Share

उस्मानाबादेत कोरोना बाधित रुग्णांचा गावभर मुक्त संचार!

Published On: 

उस्मानाबाद: सध्या कोरोना महामारीचा जिल्ह्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागात चांगलाच फैलाव होत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची चांगलीच दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू ग्रामीण भागात मात्र स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजन शुन्य त्याचबरोबर दुर्लक्षामुळे कोरोना बाधित रुग्णांचा तेर येथे गावभर मुक्तसंचार सुरू असल्याने गावातील कोरोना रुग्ण संख्या वाढीचा दर कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना या महाभयंकर महामारीचा प्रसार व संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खाजगीसह सरकारी दवाखान्ये पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले असून या रुग्णांच्या घरांवर प्रशासनाकडून टिकर चिटकावण्यात आले आहे. असे असले तरीही होम आयसोलेशन असलेले कोरोना बाधित रुग्ण सध्या गावभर तोंडाला मास्क न लावता मुक्त संचार करत आहेत.

त्यामुळे तेर येथील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करुन होम आयसोलेशनमधील कोरोना बाधित रुग्ण मोकाट फिरणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!