🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या संकटकाळात युवासेना औरंगाबाद मार्फत युवासेनेच्या वतीने मंगळवारी घाटी येथे सर्व नागरिकांसाठी मोफत भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी युवासेना उपसचिवासह आदींची उपस्थिती होती.
हा संपूर्ण कार्यक्रम काेरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आला. यामध्ये सोशल डिस्टंसिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करत, मास्क, ग्लोव्हज चा वापर करत व अन्य काही बाबी सरकार नी दिलेल्या नियमावली नुसार त्यांचं पालन केले. या वेळी अंदाजे ९०० ते १ हजार लोकांना जेवनाचे वितरण केले. हा कार्यक्रम युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
कोरोनाच्या पार्श्वभमूीवर तसेच लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळामध्ये गरजुंना जेवण वितरीत करण्यात आले. या वेळी कोरोनाचा शहरासह ग्रामीण भागामध्ये कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे सोयरे जे की रुग्णांना औषधोपचारासाठी औरंगाबाद शहरातील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यामुळे युवा सेनेच्या वतीने या वेळी अन्नदान कार्यक्रम घेण्याचे ठरवून ते गरजुंपर्यंत पोहचवण्याचे काम केले असल्याचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
