🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राने लसीकरणात आघाडी घेतली आहे. राज्यातील १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्री सध्या राज्य सरकारच्या कामगिरीचे कौतूक करत आहे. मात्र, महाराष्ट्राची क्षमता या पेक्षा जास्त असून सरकारच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरणच होत असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
या संदर्भात केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राज्य सरकारने १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. यावर प्रतिक्रीया देताना उपाध्ये म्हणाले की, ‘महाराष्ट्र क्षमतां आहेच पण आपल्या नाकर्त्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण झाल. या संथगतीला इथल सरकार जबाबदार आहे. केंद्र सर्वाधिक लसी पुरवत आहे पण लसीकरणाच नियोजन नीट केल नाही हे वास्तव. आता १ मे पासून तरूणांच्या लसीकरणाच नियोजन काय? लसीकरण मोफत की सशुल्क? किती लसी मागवल्या?’
महाराष्ट्र क्षमतां आहेच पण आपल्या नाकर्त्या धोरणामुळ रोज सरासरी २ लाख लसीकरण झाल. या संथगतीला इथल सरकार जबाबदार आहे. केंद्र सर्वाधिक लसी पुरवत आहे पण लसीकरणाच नियोजन नीट केल नाही हे वास्तव. आता १ मे पासून तरूणांच्या लसीकरणाच नियोजन काय? लसीकरण मोफत की सशुल्क? किती लसी मागवल्या? https://t.co/6irlA1ZBDn
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 27, 2021
केवळ लसीकरणाच्या गतीवरच नाही तर पुढील काळातील नियोजनावरही त्यांनी टीका केली आहे. एक मे पासून राज्यातील १८ वर्षापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. याचे नियोजन राज्य सरकारने अद्याप केलेले नाही. हे लसीकरण सशुल्क करणार आहे की, निशुल्क या बाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही, या वरुनही त्यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
