Share

प्रसिद्ध कृष्णाचा किलर लूक कॅमेरात कैद ; ख्रिस जॉर्डन देत होता टशन : पहा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) -14 च्या 21 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) पंजाब किंग्ज (पीबीकेएस) चा 5 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून केकेआरने पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंजाबच्या नेतृत्वात केएल राहुलने 20 षटकांत 9 गडी गमावून 123 धावा केल्या. केकेआरने 124 धावांचे लक्ष्य 16.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. केकेआरने सलग चार सामन्यात पराभवानंतर हा विजय मिळविला आहे. गुणतालिकेत केकेआर पाचव्या आणि पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात देखील एक लक्षवेधी घटना पाहायला मिळाली. कोलकात्याचा नवोदित गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पंजाबच्या ख्रिस जॉर्डनला डोळ्यात डोळे घालून भिडला, याचा सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/lodulalit001/status/1386708307109322756?s=20

झालं असं जेव्हा ख्रिस जॉर्डनने प्रसिद्धला दोन खणखणीत षटकार खेचले तेव्हा प्रसिद्ध रागात आला होता. मग पुनरागमन करत त्याने जॉर्डनला स्टम्पमध्ये बॉल टाकला. जॉर्डनकडून तो बॉल मिस झाला… झालं तर मग ‘यू मिस आय हिट’ या नियमाप्रमाणे बॉलने जॉर्डनचा स्टम्प उडवला आणि मग प्रसिद्धने जॉर्डनला डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. प्रसिद्धचा हा व्हिडीओ या सामन्यातील चर्चेचा विषय ठरला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!