🕒 1 min read
करमाळा – सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा. यासाठी करमाळ्याचे कै. नामदेवराव जगताप आणि सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील या दोघांच्या प्रयत्नातुन त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना सोलापूरसाठी धरण बांधणे किती गरजेचे आहे. याचे या दोघांनी महत्व पटवून दिले. यानंतर उजनी धरण निर्मिती करत असताना, हजारो शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागले. तसेच शेकडो गावे धरणाच्या निर्मितीत स्थलांतरित झाली. शेकडो स्थलांतरित झालेल्या गावांना एकच आशा होती की, निर्माण होणाऱ्या धरणामुळे आज शेकडो गावे जरुर स्थलांतरित होत असतील. परंतु सोलापूर जिल्ह्यातील हजारो गावांचा पिढ्यां-पिढ्यांचा प्रश्न मिटणार आहे. तसेच काहीसे महत्व संबंधित शेतकरी आणि गावकऱ्यांना समजावून सांगण्यात कै. नामदेवराव जगताप आणि सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील या दोघांनी मोलाची कामगिरी बजावली होती.
सध्याच्या घडीला ‘उजनी’ सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर जरुर आहे. परंतु उजनी धरणाचा लाभ मात्र दुसरे जिल्हे मोठ्या प्रमाणात घेत आहेत. सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री पुणे जिल्ह्यातील आमदार, दत्तात्रय भरणे हे आहेत. परंतु, सवत हि सवतच असते. आणि ती सावत्र लेकरांना जास्त जीव लावेल हि अपेक्षा ठेवणे कधीही गैरच ठरणार. तसाच काहीसा प्रकार आज सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत होत आहे. कारण, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील उजनीचे ५ टि.एम.सी. पाणी इंदापूरच्या धरणात पळविण्याचा प्रकार केला आहे असा आरोप शेतकरी, कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केला आहे.
दशरथ कांबळे म्हणाले, उजनी लाभक्षेत्रामध्ये हा साठा उपलब्ध नसताना सुध्दा पालकमंत्र्यांनी हा नुसता उपद़्व्याप का केला? या पळविलेल्या पाण्याचा उपयोग खऱ्या अर्थाने पुढील भविष्यकाळाचा विचार करता, बारामती ॲग्रोला होणार आहे. त्यामुळे बूजगावण्यांच्या आडून पवारांची खेळी चालू असल्याचा सध्या तरी आम्हाला अंदाज येत आहे. ज्याप्रकारे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र संपवून, फक्त खाजगीकरणाकडे जिल्ह्याला ढकलून, स्वतःचा पाया पवार परिवार मजबुत करत असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. कारण जामखेडचे आ. रोहित पवार यांनी सुध्दा उजनीवरुन पाणी पळवून नेण्यासाठी कॕनॉलचे काम सुरु केल्याचे काहीसे समजत आहे.
दशरथ कांबळे म्हणाले, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कोणाचा कधी आणि कोठे कार्यक्रम करायचा, असे म्हणणारे सोलापूर जिल्ह्यातील विद्यमान सर्वच आमदार, खासदार यांचाच जिल्ह्यात येऊन सवतीने कधी कार्यक्रम केला. याचा तुम्हालाच थांगपत्ता लागला नाही. असो, परंतु लोकप्रतिनिधी म्हणुन तरी, विद्यमान आमदार, खासदारांनी या सर्व प्रकारावर काहीतरी भाष्य करायला हवे होते. परंतु या लोकप्रतिनिधींच्या तोंडून सोलापूर जिल्ह्यासाठी एक चकार शब्दसुद्धा बाहेला पडला नाही. याचाच अर्थ तुम्हाला पाणी पळवा-पळवीचा सर्व प्रकार माहित होता. फक्त राजकिय स्वार्थासाठी आणि सवतीच्या पुनर्वसनासाठी तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा बळी देत आहात. आणि जर तुम्हाला सोलापूर जिल्ह्याचा असाच राजकिय दबावासाठी बळी द्यायचा असेल. आमदार, खासदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पाहिजे त्याची हुजरेगिरी करावी असा सल्ला दिला आहे.
दशरथ कांबळेम्हणाले, जिल्ह्याचे पाणी पळविणारे, आणि पाणी चोरांना ज्या-ज्या राजकिय नेत्यांनी साथ दिली. त्या सर्वांचा शेतकरी, कामगार संघर्ष समितीतर्फे आम्ही निषेध करतच आहोत.परंतु येणाऱ्या ५ मे रोजी, उजनीचे पाणी चोरणारांचा आणि सवतीला साथ देणारांचा शेतकरी, कामगार संघर्ष समितीच्या वतीने मौलाली माळ येथे रास्ता रोको आंदोलन करुन, आणि या चोर टोळीचा आम्ही पुतळा दहन करणार आहोत. तरी सोलापूर जिल्ह्याच्या पुढील भवितव्यासाठी आणि जिल्ह्याला अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या प्रवृत्तीना वेळीच हाणुन पाडण्यासाठी, व आज खरी राजकिय, सामाजिक संघटनांनी मैदानात उतरण्याची गरज आहे. त्यामुळे राजकिय, सामाजिक सर्वच संघटनानी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. व एकजुटीचे महत्व या पाणी चोरांना दाखवून देऊ. हिच आपणा सर्वांना शेतकरी, कामगार संघर्ष समितीच्या वतीने विनंती आहे.आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहोत की, उजनीचे जे ५ टि.एम.सी. पाणी इतर जिल्ह्यात जात आहे. ते त्वरीत थांबविण्यात यावे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- झाकीर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत दिला धीर
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ज्याच्यासाठी कमावलं तोच कोरोनाने हिरावला; वृद्ध दाम्पत्य FD मोडून करतंय कोरोना रुग्णांना मदत
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
