🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघादरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थानने केकेआरचा ६ गडी राखुन पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरने दिलेले १३४ धावांचे लक्ष्य राजस्थान संघाने १९व्या षटकात ४ गडी गमावून पार केले. ४ गडी बाद करणाऱ्या ख्रिस मॉरीसला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत राजस्थानच्या गोलंदाजानी केकेआरच्या कोणत्याही खेळाडूला खेळपट्टीवर जम बसु दिला नाही. फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या वानखेडेच्या खेळपट्टीवर राजस्थानने केकेआरच्या संघाला केवळ १३३ धावात रोखले. केकेआरकडून राहुल त्रीपाठी(३६), दिनेश कार्तिक(२५) आणि सलामीवीर नितीश राणा(२२) यांनी संघाचा डाव सावरला. राजस्थानकडून ख्रिस मॉरीसने ४ षटकात २३ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले.
That's that from Match 18 of #VIVOIPL as @rajasthanroyals win by 6 wickets to register their second win of the season.
Scorecard – https://t.co/ouszimFkdo #RRvKKR pic.twitter.com/JcLflXxXzT
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2021
दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजणक झाली. सलामीवीर जोस बटलर पुन्हा एकदा केवळ ५ धावा करत माघारी परतला. यानंतर कर्णधार संजु सॅमसन याने यशस्वी जैस्वाल(२२), शिवम दुबे(२२) आणि डेविड मिलर(२४) यांच्यासोबत भागीदारी करत राजस्थानच्या संघाला विजय मिळवुन दिला. राजस्थानकडुन कर्णधार संजु सॅमसनने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. चार गडी बाद करणाऱ्या ख्रिस मॉरीसला सामनावीराच्या पुरस्कारारने सन्मानीत करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यासाठी १८ केएल ऑक्सिजनचा साठा दाखल, गंभीर रुग्णांना दिलासा
- कोव्हॅक्सीनचे दरही निश्चित: राज्याला ६०० तर खासगी हॉस्पिटलला १२०० रुपयांना मिळेल लस
- पुण्याचं प्रशासन कुठल्या नशेत आहे?
- परभणी जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ८०४ रुग्ण, २२ रुग्णांचा मृत्यू
- औष्णिक केंद्रातील ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरण्याचे प्रयत्न करणार : मंत्री तनपुरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

