Share

कोव्हॅक्सीनचे दरही निश्चित: राज्याला ६०० तर खासगी हॉस्पिटलला १२०० रुपयांना मिळेल लस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत बायोटेकने कोरोनाची स्वदेशी लस कोव्हॅक्सीनच्या किमतीची घोषणा केली आहे. या आधी सीरमच्या वतीने तयार करण्यात आलेल्या लसीच्या किंमतीची घोषणा करण्यात आली होती. भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारांना ही लस ६०० रुपयात तर खासगी हॉस्पिटलला १२०० रुपयांमध्ये दिली जाईल.

भारत बायोटेक आणि ‘इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’ म्हणजेच आयसीएमआर यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही लस भारतातच तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक प्रभावी ठरलेल्या मोजक्या लसींमध्ये या लसीचाही समावेश होतो. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या परीक्षणांच्या आधारे या औषधीचा परीणाम ७८ टक्के होत असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

म्हणजेच ही लस घेतल्यानंतर कोरोना थांबवण्याची शक्यता ७८ टक्के आहे. विशेष म्हणजे चाचणी करण्यासाठी ज्यांना ही लस देण्यात आली होती, त्यांच्यापैकी कोणालाही गंभीर स्वरुपाची लक्षणे दिसून आलेली नाही. म्हणजेच गंभीर स्वरुपाची लक्षणे थांबवण्याबाबत या लसीचा १०० टक्के परीणाम होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!