🕒 1 min read
परभणी : शहरासह जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत रहावा, यादृष्टीने शहरासह जिल्ह्याभरातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने शनिवारी केलेल्या प्रयत्नामुळे शनिवारी रात्री उशिरा परभणी जिल्ह्यात १८ केएल ऑक्सिजन घेवून येणारा टँकर दाखल झाला आहे. शनिवारी दुपारी जालना मार्गे ऑक्सिजनचा एक टँकर दाखल झाला होता.
शनिवारी दुपारी जालना मार्गे ऑक्सीजनचा एक टँकर दाखल झाला होता. परंतू त्यातून केवळ २ केएल एवढ्याच ऑक्सीजनचा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी चिंताग्रस्त झाले होते. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून ऑक्सिजनचा साठा उपलब्ध व्हावा यादृष्टीने प्रयत्न करत होते. तसेच आमदार डॉ. राहूल पाटील यांनीही जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या पातळीवर प्रयत्न केले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संपर्क साधून जिल्ह्याची स्थिती दर्शवली होती.
त्याचा परिणाम तत्काळ औरंगाबाद येथून १८ केएल ऑक्सीजनचा साठा घेवून निघालेला टँकर शनिवारी रात्री उशिरा परभणी जिल्ह्यात दाखल झाला. एमआयडीसीतील एका खासगी प्रकल्पात तो साठा उतरवून घेतला आहे. त्यामुळे कोविड सेंटरचा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. टँकर दाखल झाल्यानंतर लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाने सुटकेच्या नि: श्वास सोडला. आता कोराना रुग्ण जे गंभीर आहेत. तसेच गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे; माजी IPS अधिकाऱ्याने सुनावलं
- कोरोना रोखण्यात राज्य सरकार पूर्णतः अपयशी! हात जोडून पाया, पडून काही होणार नाही- खा.दानवे
- ‘ताई, काळजी घ्या! वैद्यनाथ कृपेने लवकरच ठिक व्हाल’, धनंजय मुंडेंच्या खा.प्रीतम यांना सदिच्छा
- रेमडिसीवीरसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला हेल्पलाईन क्रमांक बंद! रुग्णांनी काय करावे?
- मोठी बातमी : सीबीआय दुसऱ्यांदा देशमुखांच्या निवासस्थानी; देशमुख देखील दौरा सोडून घरी परतले


