Share

परभणी जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ८०४ रुग्ण, २२ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

परभणी : जिल्ह्यात शनिवारी ८०४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५३२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसार माध्यमांना दिली आहे. या वेळी लॉकडाऊन तसेच संचारबंदीसह कोरानाबाबतीतचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

रुग्णालयातील कक्षात ७ हजार १४४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ७७६ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ३० हजार ७७७ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी २२ हजार ८५७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख २५ हजार ८६८ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ९५ हजार १६६ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २९ हजार ६८६ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ८७६ अनिर्णायक, १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्येचा कहर वाढत चालला आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची मोहिम देखील सुरु आहे. परंतू जे कोरोना रुग्णांवर उपाय सुरु आहेत, त्यांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. परंतू सरकारीसह खासगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, तसेच रेमिडिसिविर सह इतर महत्वाच्या औषधींचा तुटवडा देखील खुप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वर स्थानिक पातळीवर उपयोजना करण्याचे काम सुरु आहे. परंतू ही यंत्रणा तसेच उपययोजना ही तोकडी पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!