Share

औष्णिक केंद्रातील ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरण्याचे प्रयत्न करणार : मंत्री तनपुरे

Published On: 

🕒 1 min read

परभणी : राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ओझन निर्मितीसाठी लागणारे ऑक्सीजनचे प्रमाण कमी करणार तसेच हे ऑक्सिजन आरोग्यासाठीच वापरण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच या बाबत राज्य सरकारद्वारे काम देखील सुरु असल्याची माहिती राज्याचे उर्जा तथा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी  पत्रकार परिषदेतून दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी साडेसहा वाजता या पत्रकारपरिषदेतून तनपुरे यांनी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून ओझन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर होतो. त्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करणार आहोत. तसेच आरोग्यासाठीच ते ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात कसे वापरता येईल, या दृष्टीने राज्य सरकारद्वारे सर्वार्थाने प्रयत्न सुरु केले असल्याचे देखील या वेळी तनपुरे म्हणाले. औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन वापरावर पुर्ण निर्बंध घालले आहेत. असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले. परभणीतील जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील ऑक्सिजन प्लांट्स उभारणीत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी दूर करण्याचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरु केले असल्याचे या वेळी तनपुरे यांनी सांगितले.

एका आठवड्यात तो प्लांट कार्यान्वित होईल व त्याद्वारे दररोज ३00 सिलेंडर उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून अंबेजोगाई तसेच परभणीत हे ऑक्सिजनचे दोन प्लांट वळवले आहेत. अंबेजोगाई येथील काम अंतिम टप्पयात आहे. एक दोन दिवसात तो प्लांट कार्यान्वित होणार असल्याचेही तनपुरे यांनी या वेळी सांगितले. परभणीतील प्लांटसाठी मोठ मोठे कॉम्प्रेसर लागणार आहे. ते वापरलेले असले तरीही कॉम्प्रेसर मिळावेत, या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मंत्री तनपुरे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!