Share

पिशोरला ५० बेडचे कोविड केअर कक्ष करण्यासाठी मदत करणार : आमदार दानवे

Published On: 

औरंगाबाद : पिशोर येथे ५० बेडचे कोविड केअर कक्ष सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी पाहिजे ती मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले आहेत.या  वेळी आमदार अंबादास दानवे यांनी शनिवारी  कन्नड तालुक्यातील आढावा बैठकीदरम्यान विविध कोव्हिड केंद्रांना भेटी देवून विविध विषयांमध्ये पाहणी करुन सुचना देखील केल्या आहेत.

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात मी जबाबदार मोहिमेच्या माध्यमातून संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शनिवारी कन्नड तालुक्यातील पिशोर येथे आढावा बैठक घेतली. तसेच ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याबरोबर नवीन व चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्याचे आवाहन या वेळी दानवे यांनी केले.  पिशोर येथील ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षास भेट देऊन पाहणी केली.

याच धर्तीवर कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी  आरोग्य तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर येथे ५० बेडचे कोविड केअर कक्ष सुरू करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. तर त्यासाठी पाहिजे ती मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन या वेळी आमदार दानवेंनी दिले. त्याचप्रमाणे कन्नड तालुक्यातील टापरगाव येथे काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची लक्षणीय वाढ झाल्याने आमदार दानवे यांनी रुग्णवाढीला आळा घालण्यासाठी वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी ठोस उपाययोजना संबंधी सूचना देखील दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या         

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!