Share

रेमडिसीवीरसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला हेल्पलाईन क्रमांक बंद! रुग्णांनी काय करावे?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. हे इंजेक्शन मिळावे म्हणून रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक अक्षरश: जीवाच्या आकांताने प्रयत्न करीत आहेत. इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र शासनात राजकीय कलगीतुरा सुरू आहे. या स्थितीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी औरंगाबाद शहरात ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना तासनतास भटकंती करावी लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला हेल्पलाईन नंबरही बंदच असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले.

कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत औरंगाबाद शहरात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड शिल्लक नाहीत. मात्र ऑक्सिजनचे ५०० बेड शिल्लक आहेत. शहरात शासकीय रुग्णालय घाटी, मिनी घाटी तसेच अनेक मोठमोठे रुग्णालय असल्याने ग्रामीण जवळपासच्या तालुक्यातून, गावागावांमधून रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत.

बाहेरुन आलेल्या गंभीर परिस्थितीतील रुग्णांना रेमडिसीवीर इंजेक्शनची गरज पडत आहे. याचा काळा बाजार होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर केले आहेत. मात्र याचा कुठलाही उपयोग रुग्णांना होतांना दिसत नाही. कारण यातील दूरध्वनी आणि लँडलाईन दोन्ही क्रमांक बंद आहेत.

मनपाने दहा हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेऊन तेवढे इंजेक्शन खरेदी केले. त्यापैकी चार हजार इंजेक्शनचा वापर महापालिकेने आतापर्यंत केला आहे. शहर व जिल्ह्यातील इंजेक्शनची मागणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला दोन हजार आणि घाटी रुग्णालयाला दोन हजार इंजेक्शन महापालिकेकडे असलेल्या साठ्यातून उपलब्ध करून दिले आहेत.

आता तीन दिवस पुरेल इतकाच इंजेक्शनचा साठा महापालिकेकडे आहे. आणखी दहा हजार इंजेक्शनची ऑर्डर महापालिकेने दिली आहे. लवकरच इंजेक्शनचा नवीन साठा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्यस्थितीत खासगी रुग्णालये तुम्ही कुठूनही रेमडिसीवीर आणा असे सांगत असल्याचे रुग्णांनी सांगितले. त्यामुळे रुग्णांवर विनाकारण भटकंतीची वेळ आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!