🕒 1 min read
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नाचनवेल चौफुली अपघात स्थळ बनले असून येथे गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
येथील चौफुलीवर मंगळवारी दि.२० दोन वाहनांचा अपघात होऊन चालकांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. नाचनवेलहुन येणारी वाहने व पिशोरकडून येणा-या वाहनांचे अपघात स्थळी नियंत्रण नसल्यामुळे सतत अपघात होतात.
येथे गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग मर्यादित होत नसून अपघाताची मालिका सुरूच आहे. येथील वर्दळ पहाता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनानेही सर केले ‘माउंट एव्हरेस्ट’! नॉर्वेचा गिर्यारोहक पॉझिटिव्ह
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- जळकोटमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची नुसतीच घोषणा !


