🕒 1 min read
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात आणि राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून न्यायालय दररोज केंद्र सरकारला धारेवर धरत आहे. अशी परिस्थिती असताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकावर गंभीर आरोप केलेत. देशात ऑक्सिजनचा तुटवडा असताना ९ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशात पाठवण्यात आला आहे, असा आरोप भुजबळांनी केला.
आजमितीला ऑक्सिजनची कमतरता सर्वच राज्यांत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. अशावेळी ऑक्सिजन येथून परदेशात पाठवला जात असेल तर ती बाब गंभीर आहे, असे भुजबळ म्हणाले. लस निर्मितीसाठी कच्चा माल देण्याआधी अमेरिका पहिल्यांदा त्यांच्या नागरिकांचा विचार करत आहे आणि आपण परदेशात वाटप करत आहोत असा टोलाही भुजबळ यांनी केंद्राला लगावला.
दरम्यान, रुग्णसंख्या वाढणार हा अंदाज लक्षात घेऊन आता राज्य सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेमडेसिविर आणि कोरोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने टेंडरबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आलेत. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस यासाठी हे टेंडर असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी प्रयत्न करावा- जिल्हाधिकारी
- सकारात्मक बातमी: १०५ वर्षांचे धेनू तर ९५ वर्षांच्या मोताबाई चव्हाण दांम्पत्याने केली कोरोनावर मात
- देशात आता न्याय राहिलेला नाही, हे सर्व सरकार अस्थिर करण्यासाठीच – जयंत पाटील
- शिवाई देवीची यात्रा यंदा रद्द
- मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली बिल्डा येथील कोव्हिड सेंटरची पाहणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

